चालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...

चालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...

चालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...
www.24taas.com,वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्ली शहरातील करोलबाग भागात एका खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन निघालेली व्हॅन एटीएमजवळ आली तर खरी, मात्र एटीएम मध्ये पैसे काही डिपॉझीट झाले नाही.

आज सकाळी ही घटना घडली आहे, खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन बँकेचे अधिकारी सीएमएस व्हॅनमधून आले होते.

एटीएमजवळ आल्यानंतर व्हॅनमधून अधिकारी खाली उतरले, आणि व्हॅन चालकाने टॉप गिअर टाकून गाडीसह तेथून त्याने पळ काढला.

या बाबत पोलिस ठाण्यात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस व्हॅनचालकाचा शोध घेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 17:38


comments powered by Disqus