कॅच सोडला, पण जीव गमवावा लागला, drop catch but loss his life

कॅच सोडला, पण जीव गमवावा लागला

कॅच सोडला, पण जीव गमवावा लागला

www.24taas.com, लखीमपूर (यू.पी.)
कॅचेस् विन मॅचेस असे म्हणतात. पण, एक सोडलेला झेल आपला प्राण घेऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील एका १५ वर्षीय तरुणाला माहिती नव्हते.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील मुहम्मदी भागात ही घटना घडली. सिमरन हा १५ वर्षीय तरूण आपल्या दोन मित्रांबरोबर जवळच्या असलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्यास गेला होता. त्यावेळी त्याच्या हातून एक कॅच सुटला. त्यावरून त्याच्या मित्रांनी त्याला चिडवले. मित्रांच्या चिडवण्याचा त्याने विरोध केला असता मित्रांनी त्याला हातातल्या बॅटने मारण्यास सुरवात केली. भांडणं ऐवढी वाढली की मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली त्यानंतर ते दोघे सिमरनला अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळून गेल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांनी दिली आहे.

सिमरनच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी मुहम्मदी ठाण्यातील संबंधित युवकांविरोधात अजाणतेपणी हत्या केल्याचा आरोप दाखल केला आहे.

First Published: Monday, December 10, 2012, 17:16


comments powered by Disqus