Last Updated: Monday, November 11, 2013, 09:19
www.24taas.com, झी मीडिया, पणजीपर्यटननगरी गोव्यात सध्या स्थानिक आणि नायजेरियन व्यक्तींमध्य़े ड्रग्स वॉर सुरु आहे. गोव्यात पर्यटकांच्या बेकायदेशीर वास्तव्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचं समोर आलंय.
गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येतात.. यात गेल्या १० वर्षापासून नायजेरियन नागरिकांची संख्या वाढतेय. यातले बरेच जण शिक्षणासाठी शैक्षणिक व्हिसावर गोव्यात येतात. मात्र व्हिसा संपल्यावरही हे नायजेरियन पर्यटक गोव्यात तळ ठोकून असतात... सध्या ५०० नायजेरियन गोव्यात स्थायिक झालेत... त्यातले १९ नोंदणीकृत आहेत.. गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर हैदोस घातल्याप्रकरणी अटक केलेय्या ५२ नायजेरियनपैकी एकाकडे पासपोर्ट आहे...गोव्यातले बहुतांशी नायजेरियन नागरिकांचा ड्रग्स व्यावसायाशी संबंध आहे. कधी ड्रग्स माफिया बनून तर कधी एजंट म्हणून ते हा ड्रग्सचा व्यवसाय करतातत.
अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पर्यटकांवर कारवाई करताना पोलिसांना युनो आणि आतंरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं लागते... कारवाई करताना आणि केल्य़ानंतर संबधित पर्यटकाच्या दूतावासांना माहिती द्यावी लागते... त्यामुळं अशा घटनांमध्ये कारवाई विचारपूर्वक होते...नायजेरियन पर्य़टकांसह इस्त्रायली आणि रशियन नागरिकांच्या बाबतीतही पोलीस सावध भूमिका घेत आहेत.
आतंरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणा-या गोव्यात लाखो पर्यटक येतात. मात्र या पर्यटकांसह काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे पर्यटक गोव्यात वाढतात. त्यामुळं प्रशासनापुढं आव्हान निर्माण झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, November 11, 2013, 09:19