खबरदार, गाडीवरील फॅन्सी नंबर प्लेट लावाल तर!, due to fancy number plate you will have to pay 2000 rupees

खबरदार, गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लावाल तर!

खबरदार, गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लावाल तर!
b> www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली

तुम्ही तुमच्या गाडीचा लूक बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहात. तर थांबा. तुमच्या गाडीची नंबर प्लेट जर फॅन्सी स्टाईलमध्ये असेल तर तुम्हाला भरावा लागेल दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड २००० रुपये असेल.

नवीन गाडी घेत असाल तर साधीच नंबर प्लेट बसवा आणि दंड वाचवा. या आधी फॅन्सी नंबर प्लेट असल्यावर १०० रुपये दंड भरावा लागत असे मात्र आता हा दंड १०० रुपयांवरुन २००० रुपये इतका करण्यात आलाय.

देशाची राजधानी दिल्ली येथे फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना आता २००० रुपये दंड भरावा लागणार आहे आणि दुसऱ्या वेळेलाही जर पुन्हा हीच चूक केली गेली तर चालकाला जेलची हवा खावी लागेल.


फॅन्सी आणि गोंधळात टाकणाऱ्या नंबर प्लेटविरोधात बुधवारी नवी दिल्लीत विशेष अभियान सुरु करण्यात येणार आहे. आधी अशा नंबर प्लेटसना १०० रुपये दंड भरावा लागत असे पण आता २०००रुपये दंड भरावा लागेल आणि जर हीच चूक पुन्हा एकदा केली गेली तर ५००० रुपये दंड वा वर्षभरासाठी कैद होऊ शकते अथवा दोन्ही शिक्षा एकाचवेळी होऊ शकतात, असा इशारा देण्यात आलाय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 13:06


comments powered by Disqus