दुर्गा यांचा भिंत पाडण्यात हात नाही -वक्फ बोर्ड, Durga had no role in demolishing mosque wall: Waqf Board

दुर्गा यांचा भिंत पाडण्यात हात नाही - वक्फ बोर्ड

दुर्गा यांचा भिंत पाडण्यात हात नाही - वक्फ बोर्ड
www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली

महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांचा मजिद भिंत पाडण्यामागे कोणताही हात नाही, असा खुलासा उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने केला आहे. त्यामुळे अखिलेश यादव सरकार अधिकच अडचणीत आले आहे. दरम्यान, केंद्राने हस्तक्षेप केला तर त्यांना शिंगावर घेण्याची भूमिका समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी घेतलीय.

दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित केल्यानं उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव सरकारवर टीकेची झोड उठलीय. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही या वादात लक्ष घातलंय. पण यावरून केंद्र सरकारलाही शिंगावर घेण्याची भूमिका सपा नेत्यांनी घेतलीय.

दनकौर भागातील कादलपूर गावाचा दौरा उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने केला. यावेळी समितीने घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे की, नागपाल यांनी मजिदची भिंत पाडण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. त्यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला. यावेळी नागपाल यांनी सांगितले की, अवैध बांधकामाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पालन करा. वक्फ बोर्ड समितीने केलेल्या या खुलाशानंतर दुर्गा या वाळूमाफियांच्या हिटलिस्टवर असल्याचे स्पष्ट झालेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013, 10:35


comments powered by Disqus