यूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे, durga shakti Nagpal suspension Back

यूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे

यूपी सरकार दबले, दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन मागे
www.24taas, झी मीडिया,लखनऊ

उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सरकार दबावामुळे अखेर दबले. वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम उघडणार्‍या महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचे निलंबन उत्तर प्रदेश सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहे.

दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनावरून चहूबाजूने टीका होऊ लागल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुर्गाशक्ती यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आल्याचे जाहीर केले. मात्र, वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड कारावाई केल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाची कारवाई वाळू माफियांच्या दबावावरुन करण्यात आली होती. मात्र एका धार्मिक स्थळाची भिंत पाडण्याचे आदेश दिल्यामुळं दुर्गा नागपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचं उत्तरप्रदेश सरकारचं म्हटले होते. मात्र, दबाव वाढल्यानंतर ताठर भूमिका घेणाऱ्या यूपीतील यादव सरकारला नमते घ्यावे लागले.

दरम्यान, दुर्गा नागपाल या पहिले पंजाबमध्ये कार्यरत होत्या. त्यांचं ग्रेटर नोएडामध्ये पोस्टिंग त्यांच्या पतीच्या आग्रहावरुन केलं होतं, असंही अखिलेश यादव यांनी मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं. मात्र, वाळूमाफियांच्या विरोधात उघडउघड मोहीम राबविल्याने याचा राग दुर्गाशक्ती नागपाल यांचे पती आयएएस अभिषेक सिंग यांची बदली करून काढण्यात आला होता. एका प्रेस नोटच्या साहाय्यानं राज्य सरकारनं पत्रकारांना अभिषेक सिंग यांच्या बदलीच्या निर्णयाविषयी माहिती दिली होती. अभिषेक सिंग यांना झाशीच्या ‘जॉईंट मॅजिस्ट्रेट’ येथे नियुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी ते गाजियाबाद येथे होते. अभिषेक यांच्यासह २०११ च्या बॅचच्या अन्य १५ आयएएस आधिकाऱ्यांचीदेखील बदली केल्याचं अखिलेश सरकारनं म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 9, 2013, 11:14


comments powered by Disqus