करवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिडDuring Karavachoutha acid fed to a wife in Delhi

करवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड

करवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

करवाचौथ... नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं व्रत... पत्नी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी नवरा घरी यायची वाट पाहते. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन आपलं व्रत तोडते. पण जर नवऱ्यानं पाण्याऐवजी तेजाब पाजलं तर... अशीच घटना घडलीय दिल्लीतल्या कल्याणपुरी भागात... इथं राहणारी महेश कुमारी सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी झगडतेय.

करवाचौथच्या दिवशीच विजयनं पत्नी महेश कुमारीला तेजाब पाजलं. आपल्या गुन्हाची त्यानं कबुली दिली नाही. मात्र त्याच्या मुलीनं आपल्या वडिलांचा खरा चेहरा पुढं आणत आईला मारणारा हाच हे पोलिसांना सांगितलं. पोलीस आता पुढचा तपास करत आहेत.

पाणी म्हणजे जीवन... पण पाण्यावरुनच सुरू झालेल्या वादानं तिचा जीव घेतलाय. विजयच्या कृत्याचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 09:07


comments powered by Disqus