वैष्णो देवी यात्रेला जाणं आता आणखी सोप्पं! Easy to go Vaisho Devi

वैष्णो देवी यात्रेला जाणं आता आणखी सोप्पं!

वैष्णो देवी यात्रेला जाणं आता आणखी सोप्पं!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

वैष्णो देवी मंदिराच्या यात्रेला जाणं आता भाविकांसाठी अधिक सोपं होणार आहे. कारण वैष्णो देवीच्या गुंफा मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या कटरा शिबिरापर्यंत जुलै महिन्यापासून अनेक मेल्स, एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन्स सुरू होत आहेत.

२५ किमी लांबीच्या उधमपूर-कटरा रेल्वेलाइनचं काम पूर्ण होत आलंय. रेल्वेला कटरापर्यंत परवानगी मिळाल्यावर या ट्रेन्स वैष्णो देवीच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचतील. त्यामुळे सर्वच भाविकांची चांगली सोय होऊ शकते. हा रेल्वे मार्ग खडतर पहाडी भागातून जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे प्रमुख विनय मित्तल आणि उत्तर रेल्वेचे महाप्रबंधक वि. के. गुप्ते या लोहमार्गाची पाहाणी करतील.

सध्या ट्रेन्स फक्त जम्मू तावीपर्यंतच जातात. त्यापुढील प्रवासासाठी भाविकांना रस्त्यांचाच वापर करावा लागतो. मात्र जुलैपर्यंत ट्रेन्स सुरू झाल्यावर भाविकांसाठी मोठीच सोय होणार आहे. जुलैपासून नवी दिल्ली- उधमपूर एक्सप्रेस, सराय रोहिल्ला- उधमपूर एक्सप्रेस, जम्मू मेल, चंदिगढ – कटरा एक्सप्रेस, अहमदाबाद- उधमपूर एक्सप्रेस, दिल्ली- पठाणकोट एक्सप्रेस, उत्तर संपर्क क्रांती इत्यादी ट्रेन्स भाविकांच्या सेवेत हजर होणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 15:58


comments powered by Disqus