‘गोमांस’ खा, शक्तिमान व्हा - अल्पसंख्याक मंत्रालय, eat cow meat, make stronger- minority ministry

‘गोमांस’ खा, शक्तिमान व्हा - अल्पसंख्याक मंत्रालय

‘गोमांस’ खा, शक्तिमान व्हा -  अल्पसंख्याक मंत्रालय
www.24taas.com, लखनऊ
केंद्रातील यूपीए सरकारच्या ‘अल्पसंख्याक’ मंत्रालयाने ‘गोमांस’ भक्षण हे चांगले असून त्याचा खुलेआम प्रचार सुरू केला आहे. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशात उजेडात आला आहे. ‘गोमांस खा आणि शरीरातील लोहाची कमतरता भरून काढा’ असा सल्ला असलेली पुस्तिका अल्पसंख्याक मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

त्या पुस्तिकेने उत्तर प्रदेशासह देशात एकच खळबळ उडाली असून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘अल्पसंख्याक’ मंत्रालयाच्या मेरठ येथील कार्यालयावर भाजपतर्फे खासदार राजेंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रचंड मोर्चाही काढण्यात आला.

त्यानंतर ‘गोमांस’ भक्षणाचा प्रचार करणारी ती संतापजनक पुस्तिका जप्त करण्याचे आश्वायसन दिले. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गाय आणि गोवंश यांच्या संरक्षणाचे स्पष्ट निर्देश केंद्र आणि राज्यांच्या सरकारांना दिलेले आहेत, याकडे उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी लक्ष वेधले आहे.

First Published: Friday, February 15, 2013, 10:24


comments powered by Disqus