Last Updated: Friday, August 9, 2013, 15:14
www.24taas.com झी मीडिया, अहमदाबादगुजारातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातील मुस्लीमांना ईद निमित्तांन शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या शुभेच्छा देतांना ते म्हणालेत, ‘ईद मुबारक!’
मोदी यांनी सोशल नेटवर्किग वेबसाईट ट्विटरवरून ईद निमित्त शुभेच्छा दिल्यात. देशातील जनतेला सुखशांती मिळू दे, समृध्दी आणि भरभराट होवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या चांगल्या दिवशी सर्वांना ईद मुबाराक, असे ट्विट केले.
रमजानच्या पवित्र महिन्याच्या शेवटी ईद उत्साहात साजरी केली जाते. दिल्लीमध्ये आज पाऊस कमी असल्याने ईद निमित्ताने उत्साह दिसून येत आहे. लोकांमध्ये आधिक उत्सुकता असल्याने सर्वजण या आनंदात एकमेकांसोबत शुभेच्छा देताना दिसत आहेत.
देशात आज ईद मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरी केली जात आहे. एकमेकांच्या भेटी घेऊन आणि आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 9, 2013, 12:47