वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशीचा निर्णय Enquiry on Walmart lobbying

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशीचा निर्णय

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशीचा निर्णय
www.24taas.com, नवी दिल्ली

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. निवृत्त न्यायाधीशामार्फत ही चौकशी होणार असल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी लोकसभेत केली. सोमवारपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांनी या मुद्द्यावर गोंधळ घातला होता. चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी विरोधकांची मागणी आहे. सरकारनं हा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घ्यायला हवा होता, असं भाजप खासदार मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलंय.

वॉलमार्ट लॉबिंग प्रकरणी चौकशी मागणी मान्य झाल्यानंतरही संसदेतला गोंधळ कायम आहे. लोकसभेत कोळसा खाण वाटपाच्या मुद्द्यावरून बसपा सदस्यांनी गोंधळ घातला. यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. राज्यसभेतही बढतीमध्ये आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणी करत बसपा सदस्यांनी गोंधळ घातला. दलितविरोधी सरकार चालणार नाही, अशा घोषणा ते देत होते.

दरम्यान, पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनाही खडे बोल सुनावले. 12 वाजल्यानंतर तुम्ही निघून जाता, त्यामुळे कामकाज नीट होत नाही असं त्या म्हणाल्या.

First Published: Wednesday, December 12, 2012, 21:08


comments powered by Disqus