माजी लष्करी अधिकाऱ्यांनं पत्नीचे केले १०० तुकडे, Ex-Army officer murders wife, chops body into countless pieces

माजी लष्करी अधिकाऱ्यांनं पत्नीचे केले १०० तुकडे

माजी लष्करी अधिकाऱ्यांनं पत्नीचे केले १०० तुकडे
www.24taas.com, झी मीडिया, भूवनेश्वर

लष्कराच्या एका सेवानिव्वृत्त अधिकाऱ्यानं आपल्या पत्नीची निर्द्यीपणे हत्या करुन तिच्या शरीराचे १०० तुकडे केले. ही भयंकर घटना ओडिसामध्ये घडलीय. हत्येनंतर गेले कित्येक दिवस हा व्यक्ती शवाची विल्हेवाट लावत होता. मात्र, शुक्रवारी त्याचा हा प्रताप उघडकीस आला आणि तो पकडला गेला.

शुक्रवारी सर्वांसमोर घडलेली ही भयानक घटना १५ दिवसांपूर्वीच घडली होती अशी माहिती मिळालीय. सोमनाथ परिदा असं या आरोपीचं नाव आहे. त्याला नयापल्लीमध्ये अटक करण्यात आलीय. ‘आरोपीनं गुन्हा कबूल केलाय पण ही हत्या का झाली याची मात्र आम्ही सध्या चौकशी करत आहोत’ असं पोलीस आयुक्त नितीनजीत सिंग यांनी माहिती दिलीय. आयुक्तांच्या माहितीनुसार, या सेवानिवृत्त अधिकाऱ्याची पत्नी उसाश्री हिच्या शरीराचे तुकडे हे घरातील डब्ब्यात सापडले. ते पूर्णपणे सडून गेले होते. नातेवाईकाकडून जेव्हा त्यांच्याबद्दल चौकशी झाली तेव्हा ही घटना समोर आलीय.

अमेरिकेत राहत असलेला त्यांचा मुलगा गेले कित्येक दिवस घरी फोन करत होता. मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून त्याने त्याच्या नातवाईकास चौकशी करण्यास सांगितले, तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला. नातेवाईक सोमनाथच्या घरी गेला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीची चौकशी केली असता सोमनाथने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अवस्थाही विचित्र होती. घरातही दुर्गंधी पसरली होती. जेव्हा त्याची नजर कचऱ्याच्या डब्ब्याकडे गेली तेव्हा त्यात सडलेले शरीराचे तुकडे सापडले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 23, 2013, 11:20


comments powered by Disqus