एक्सप्रेस घसरली; चार ठार, ५० जखमी, Express train derails in TN; 2 dead, 50 injured

एक्सप्रेस घसरली; चार ठार, ५० जखमी

एक्सप्रेस घसरली; चार ठार, ५० जखमी
www.24taas.com, चेन्नई

तामिळनाडूत मुजफ्फरपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस रुळांवरुन घसरली. या दुर्घटनेत चार जण ठार तर २४ जण जखमी झालेत. तामिळनाडूतील आराकोरमच्या चितेरी स्थानकात ही दुर्घटना घडलीय.

तामिळनाडूच्या अराक्कोनमनजीक सिथारीमध्ये पहाटेच्या सुमारे ५.५० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलीय. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना दक्षिण रेल्वेच्या बचाव दलानं हॉस्पीटलमध्ये हवलवलंय. ट्रेनचे ११ कोच रेल्वे रुळावरून घसरलेत. यामध्ये पाच एसी कोच, पाच नॉन एसी कोच व पेन्ट्री कोचचा समावेश आहे.

या दुर्घटनेमुळे अराक्कोनम जंक्शनमध्ये रेल्वे प्रवासावर थोडा परिणाम दिसून येतोय. यापूर्वी २०११ मध्येही सिथारीमध्येच अराक्कोनम-कटपाडी ट्रेनला दुसऱ्या एका ट्रेननं धडक दिली होती. त्या दुर्घटने नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

First Published: Wednesday, April 10, 2013, 10:26


comments powered by Disqus