Last Updated: Wednesday, April 3, 2013, 17:08
www.24taas.com, नवी दिल्लीसरकारी कारागृहात दहशतवादी कारवायंच्या आरोपाखाली अडकलेल्या मुस्लिम युवकांवरील खटल्यांचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी वेगळ्या फास्ट ट्रॅक कोर्टांची व्यवस्था करण्यात येईल. यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेता एबी वर्धन यांनी निर्दोष मुस्लिम तरुणांना झालेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात शिंदेंना प्रश्न केला होता. या निर्दोष मुस्लिम युवकांवरील आरोपांचा लवकरात लवकर निकाल लावता यावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची व्यवस्था करण्यात येईल, असं अश्वासन सुशील कुमार शिंदे यांनी दिलं आहे.
हे मुस्लिम युवक गेली दोन वर्षं तुरुंगात असून यांना अजून जामिनावरही सोडण्यात आलेलं नाही. या तरुणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करून लवकरच त्यांची सुटका व्हावी, यासाठी राजकीय पक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली होती.
First Published: Wednesday, April 3, 2013, 17:08