अपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार Father kills mother for death of child

अपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार

अपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरवून पत्नीलाच गोळी मारल्याची घटना आग्र्याला घडली आहे. मुकेश असे या आरोपीचे नाव आहे. बायकोच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला या समजातून त्याने हे कृत्य केलं.

सौरभची आई पूजा करण्यासाठी मंदिरात गेली होती तिच्याबरोबर सौरभही गेला होता. रस्त्यात तो कालव्यात खेळण्यासाठी थांबला आणि खेळता खेळता तो त्या पाण्यात बुडायला लागला. सुनीताने त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांना हाक मारली. लगेच त्याला जवळच्या भरतपुर हॉस्पिटलमध्ये भरतीही करण्यात आले. पण डॉक्टर मात्र त्याला वाचवण्यात अपयशी ठरले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुकेश याने आपला मुलगा सौरभ याचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर त्याने आपल्या बायकोला गोळी मारली आणि तेथून तो फरार झाला. यासंबधी पोलिस ठाण्यात हत्येची केस दाखल करण्यात आलीय. तसेच पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 30, 2013, 18:30


comments powered by Disqus