नराधम पिता, बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं, FATHER MARRIAGES DOUGHTER AFTER RAPE

नराधम पित्याने बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं

नराधम पित्याने बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं
www.24taas.com, झी मीडिया, मेरठ, उत्तर प्रदेश

मुलगी आणि पित्याच्या पवित्र नात्याला काळीमा लावण्याचा प्रकार मेरठमधील लिसाडीत झाला आहे. या नराधम पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर प्रकरण पंचायतीत पोहोचला.

पंचांनीही काहीही विचार न करता, या मुलीशी पित्याचं लग्न लावून दिलं आणि मुलगी आणि पित्याला गाव सोडण्यास सांगितलं.

या मुलीच्या आईचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं, तिचे दोन्ही भाऊ आजी-आजोबांकडे राहत होते, तर मुलगी आपल्या वडिलासोबत राहत होती.

ही मुलगी अनेक दिवसांपासून घराबाहेर आली नव्हती, तिचे वडिल काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा ती एकदा बाहेर आली, मात्र ती गरोदर असल्याचं परिसरातील लोकांना समजलं.

यानंतर आपल्या पित्यानेच आपल्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची कबुली पीडित मुलीने दिली. बाहेरून आल्यानंतर मुलीच्या वडिलांना शेजाऱ्यांनी चोप दिला.

हे प्रकरण संबंधित मुलीच्या आजी-आजोबांना कळलं तेव्हा, ते प्रकरण पंचायतीत नेण्यात आलं. मात्र पंचायतीनेही विचित्र न्याय केला. या मुलीचं लग्नच त्यांनी तिच्या पित्याशी लावून दिलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 18:13


comments powered by Disqus