वडिलांनीच केला आपल्या मुलींचा सौदा..., father sale three girls

वडिलांनीच केला आपल्या मुलींचा सौदा...

वडिलांनीच केला आपल्या मुलींचा सौदा...
www.24taas.com, झी मीडिया, रोहतक

आपल्या तीन अल्पवयीन मुलींची विक्री करू पाहणाऱ्या एका क्रूर बापाला पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात दलालाची भूमिका बजावणाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केलीय. हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडलीय.

संबंधित तीनही अल्पवयीन मुलींना आपणं आपल्या बापाच्याच हातून विकले जात आहोत, याचा सुगावा लागताच त्यांनी मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. मोठ्या बहिणीने दुसऱ्या काही नातेवाईकांच्या मदतीने त्या तीनही बहिणींची सुटका केली.

‘गेल्या सहा महिन्यांपासून आम्हाला वेगवेगळी लोकं बघायला यायची. एकदा शाळेतून परतत असताना मी वडिलांचे फोनवरील भाषण ऐकलं त्यावरून आमचा ५०,००० रूपयाला सौदा झाल्याचं मला समजलं’ अशी पीडित या मुलींनी पोलिसांना दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013, 17:42


comments powered by Disqus