केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल FIR lodged against kejariwal

केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल

केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल
टीम अण्णांच्या काही सदस्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, नीरज कुमार आणि गोपाळ राय या टीम अण्णामधील सदस्यांवर दंगल भडकवण्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

कोळसा घोटाळा प्रकरणावरून रविवारी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि भाजपाच्ये अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याही घरासमोर आंदोलन केलं. नवी दिल्लीतील हे भाग व्हीव्हीआयपी असल्यामुळे या ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शन केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मारहाणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात केजरीवाल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कलम-१४४ कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनातच टीम अण्णामधील सदस्य असणाऱ्या किरण बेदी अनुपस्थित होत्या.

First Published: Tuesday, August 28, 2012, 08:15


comments powered by Disqus