दिल्लीतील आगीत एक ठार, fire at himalaya house in delhi

दिल्लीतील आगीत एक ठार

दिल्लीतील आगीत एक ठार
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीतल्या प्रसिद्ध अशा हिमालय हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झालाय. इमारतीच्या सातव्या मजल्यावर एकाचा मृतदेह सापडलाय.

दिल्लीतल्या कस्तुरबा गांधी रोडवर ही इमारत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास या इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या ३० गाड्या दाखल झाल्यात.

इमारतीच्य़ा तीसरा चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग लागली असल्यानं ती आटोक्यात आणण्यास वेळ लागत होता मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलय. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही आग सकाळी ६.३० च्या सुमारास लागली आहे. तब्बल ३ तासाच्या प्रयत्नानंतर ही आग रोखण्यास यश मिळाले.

First Published: Monday, November 19, 2012, 13:26


comments powered by Disqus