Last Updated: Tuesday, October 15, 2013, 12:52
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआसाममधल्या दिब्रुगडमध्ये राजधानी एक्स्प्रेसला आग लागली होती. पेन्ट्री कारला ही आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. आता जळालेला पेन्ट्री कारचा डबा एक्स्प्रेसपासून वेगळा करण्यात आलाय.
राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढहून दिल्लीला येत होती. ही घटना आसाममधील मोरिगांव जिल्ह्यातील धरमतुल रेल्वे स्टेशननजीक घडली. ट्रेनच्या पँट्रीला सकाळी सुमारे सडे चारच्या सुमारास आग लागली. ही आग वाढत गेली. यानंतर ट्रेन धरमतुल रेल्वे स्टेशनला थांबली. पोलीस आणि रेल्वे विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीला लागलेल्या आगीमुळे रेल्वे वाहतूक ३ तास ठप्प होती.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तास मेहनत करून ही आग नियंत्रणात आणली. सकाळी ८ वाजता आगीवर नियंत्रण मिळववलं. यानंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली. रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 12:52