Last Updated: Saturday, September 8, 2012, 20:13
www.24taas.com, चंदिगढ हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चांद मोहम्मद ऊर्फ चंद्रमोहन यांची माजी पत्नी अनुराधा बाली ऊर्फ फिजा यांच्या शरीरात कीटकनाशक आणि दारु आढळून आली आहे. फिजाच्या शरीराचा व्हिसेरा रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिसेरा रिपोर्टमध्ये फिजाच्या पोटात कीडे मारण्याचे औषध आढळून आले आहे. फिजाचा मृतदेह 6 ऑगस्टला तिच्या घरात आढळून आला होता. तिचा मृतदेह चार- पाच दिवस सडलेल्या अवस्थेत मिळाला होता. मात्र फिजाला कुणी विष दिले हे अजून सिद्ध झाले नाही.
खरडमधील केमिकल एनालेसिस लॅबने दिलेल्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. इकडे, मोहालीचे पोलिस अधिक्षक गुरप्रित सिंग भुल्लर यांनी म्हटले आहे की, रिपोर्ट अजून पोलिसांपर्यंत पोहचलेला नाही. जर तसे असेल तर खूनाचा गुन्हा दाखल करु.
First Published: Saturday, September 8, 2012, 20:07