चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन, Fodder scam: SC grants bail to Lalu Prasad Yadav

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.ऑक्टोंबर महिन्यात रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणात लालूंना दोषी ठरवत त्यांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. लालूंना २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

लालूंनी या शिक्षेला रांची उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने लालूंची याचिका फेटाळून लावल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या घोटाळयात लालूंसह ४४ जणांना सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले होते. मात्र लालू वगळता सर्व आरोपींना जामीन मिळाला होता. दोषी लोकप्रतिनिधींबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार न्यायालयाच्या या निर्णयामळे लालूप्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली.

पशुखाद्य म्हणजेच चारा घोटाळ्याचे नाव घेतले जाते. बनावट देयके सादर करून बिहार सरकारच्या तिजोरीतून कोटयवधी रुपये काढण्यात आले. ही रक्कम सनदी अधिकारी, पशुपालन विभागातील अधिकारी व राजकीय नेत्यांच्या संगनमतातून लाटण्यात आली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 13:52


comments powered by Disqus