लालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!, Fodder scam verdict : Lalu Prasad sentenced to five years in jail

लालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!

लालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!
www.24taas.com, झी मीडिया, रांची

सीबीआयच्या विशेष न्यायालयानं चारा घोटाळ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावलाय. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.

लालूंना मात्र जोरदार झटका दोनदा बसणार आहे. कारण, या शिक्षेसोबत त्यांची खासदारकीही रद्द होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे शिक्षा सुनावली गेली. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते जगन्नाथ मिश्री यांना चार वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलाय.

लालूंना रांचीच्या विशेष सीबीआय न्यायालयानं सोमवारील १७ वर्ष जुन्या असलेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी अन्य ४४ आरोपींसोबत दोषी करार केलं गेलं होतं. आज या खटल्यासंदर्भात लालूंना शिक्षा ठोठावण्यात आलीय.

कोर्टानं याप्रकरणी आठ दोषींना जामीनावर मुक्त केलंय. या आठ जणांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोर्टानं तीन दोषींविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. हे तीन जण कोर्टासमोर हजर झाले नव्हते. सोमवारी विशेष न्यायाधीश पी के सिंह यांनी लालू आणि अन्य ४४ लोकांना चाईबासा कोषागरमधून बेकायदेशीरपणे ३७.७० करोड रुपये काढण्याच्या प्रकरणात दोषी करार दिलं होतं. १९९४ ते १९९५ पर्यंतच्या काळात ही रक्कम कोषागरातून काढण्यात आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 3, 2013, 15:03


comments powered by Disqus