Last Updated: Tuesday, August 27, 2013, 07:20
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीयुपीए सरकारचं सर्वात महत्त्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. अन्न सुरक्षा विधेयकाचा युपीए सरकारचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या बाजून लागला आहे.
सुरुवातीला झालेल्या मतदनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं फेरमतदान घेण्यात आलं. हे विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याची टीका करणा-या भाजपानंही या विधेयकाला पाठिंबा दिलाय. त्याचबरोबर जेडीयू, बसपा आणि आरजेडी या युपीए बाहेरच्या पक्षांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला. या विधेयकावर विरोधकांनी सुचवलेल्या शिफारसी फेटाळण्यात आल्या.
या विधेयकाचा देशातल्या 67 टक्के म्हणजेच 82 कोटी जनतेस फायदा होणार आहे. यामुळे एकही व्यक्ती उपाशी राहणार नसल्याचा दावा सरकारनं केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 23:16