योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!, foreigner lady raped by her yoga teacher

योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!

योगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!

www.24taas.com, वृत्तसंस्था, पणजी

परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय. आपल्याला योगाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकानंच आपल्यावर अतिप्रसंग केल्याचं तीनं म्हटलंय. या प्रकरणी प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केलीय.

मोरजीम गावात ही मूळची नेदरलँडची रहिवासी असलेली २५ वर्षीय परदेशी महिला योगाचं प्रशिक्षण घेत होती. मुळचा उत्तरप्रदेशातील असलेला कृष्णा शर्मा हा तिला योगाचे धडे देत होता. अंजूना बीचवर ग्रुपमध्ये पार्टी झाल्यानंतर कृष्णा तिच्या मागोमाग तिच्या खोलीत शिरला आणि तिथं त्यानं तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेनं केलीय.

या घटनेनंतर महिलेनं ताबडतोब परनेम पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर मात्र कृष्णा गायब झाला. अखेर मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना डाबोलिम विमानतळावरून पोलिसांनी त्याला अटक केलीय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 10, 2013, 17:33


comments powered by Disqus