Last Updated: Thursday, June 19, 2014, 15:27
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.
मार्च 2013 ला एच7 एन9 हा विषाणू जोरदारपणे प्रसारला होता. हा विषाणू बर्ल्ड फ्लूचा असल्याचे स्पष्ट झाले. या बर्ल्ड फ्लूमुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. बर्ल्ड फ्लूचा धोका पुन्हा भारत आणि चीन सहित पाच आशियातील देशांमध्ये होण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
बर्ल्ड फ्लूचा धोका हा प्रामुख्याने ज्या देशात कुक्कुट पालनाचा व्यवसाय केला जातो, त्या देशात जास्त होण्याची शक्यता आहे. चीन, बांग्लादेश, भारत, इंडोनेशिया,फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या देशांना धोका आहे.
दक्षिण पूर्व आणि पूर्व चीन येथील किनारी असलेला शहरी भागात एच7 एन9 विषाणू पसरतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच बांग्लादेश आणि भारताच्या बंगालच्या क्षेत्रात, व्हिएतनाममधील लाल नदी आणि मेंकाग डेल्टा, इंडोनेशिया आदी क्षेत्रात या विषाणुंचा धोका आहे. बर्डफ्लू संदर्भातील माहिती नेचर कम्युनिकेशन पत्रिका प्रकाशित झाला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 19, 2014, 15:27