Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:46
www.24taas.com, नवी दिल्ली येत्या ऑक्टोबरपासून तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी रोमिंग चार्जेसची काळजी करायची गरज तुम्हाला उरणार नाही. कारण, ऑक्टोबरपासून फ्री रोमिंग लागू होणार आहे.
१६ रुपये आऊटगोईंग आणि ९ रुपये इनकमिंग अशा दरावरून सुरू झालेली रोमिंग सेवा आता फ्री होणार आहे. २०१३ पासून देशभरातून रोमिंग चार्जेस काढून टाकण्यात येतील, अशी घोषणा मागच्या वर्षी दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी केली होती. नव्या दूरसंचार धोरण जाहीर करताना त्यांनी नागरिकांना दिलासा दिला होता.
मे २०१२ मध्ये मंत्रीमंडळानं मंजूरी दिलेल्या नव्या टेलिकॉम धोरणामध्ये रोम फ्री मोबाईलची शिफारस करण्यात आली होती. यामुळे मोबाईल धारक ग्राह देशभरात एकच नंबर वापरू शकतील तसंच आपल्या दूरसंचार सर्कलच्या बाहेर गेल्यास त्यावर अतिरिक्त शुल्काचा भूर्दंडही त्यांना बसणार नाही.
सध्या, ग्राहकांना वेगवेगळ्या राज्यात गेले की, रोमिंग चार्जेस द्यावा लागतो. देशात खासगी वेगवेगळ्या कंपन्या असल्याने त्यांच्या नेटवर्कचा वापर केला की, रोमिंग चार्जेस द्यावा लागतो. ग्राहकाला आपल्या राज्यातून इतर राज्यात जावे लागले की इतर नेटवर्कचा वापर करावा लागतो.
First Published: Thursday, March 7, 2013, 15:46