अहिंसावादी राष्ट्रपित्याची १४४ वी जयंती..., gandhiji`s 144 birth anniversary

राष्ट्रपित्याची १४४ वी जयंती...

राष्ट्रपित्याची १४४ वी जयंती...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आज गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा महात्म्याचा आज जन्मदिवस... जगभरात आजचा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रपित्याची आज १४४ वी जयंती... एक स्वातंत्र सैनिक आणि थोर विचारवंत म्हणून प्रत्येक भारतियाच्या मनात बापूजींबद्दल आदराचं स्थान आहे.

पुण्यात गांधी सप्ताह...
महात्मा गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र गांधी स्मारकनिधिच्या वतीनं महात्मा गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या सप्ताहाच उद्घाटन माजी राष्ट्रपति प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. गांधीजींच स्मरण करण्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमच आयोजन करण्यात येतं. देशातील विविध आठ धर्माच्या धर्मगुरूंनी यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना म्हटली. आजच्या तरुण पिढीला गांधीजी समजण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे अस मत प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केलं.
व्हिडिओ पाहा :




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 09:45


comments powered by Disqus