अल्पवयीन मुलीवर गँगरेप, चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक, Gang rape case arrest 4 student

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, चार अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक
www.24taas.com, नवी दिल्ली

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जवळजवळ तिच्यावर दोन महिने गँगरेप करणाऱ्याच्या आरोपाखाली नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या शाळेतील चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मेजेस्ट्रीट गौरव राव यांनी आरोपी पुलकित चौधरी, अमनदीप, शरद शेखर तोमर आणि रूपांशू यांना ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

दक्षिण दिल्लीतील डिफेंन्स कॉलीनीत १५ सप्टेंबरला पीडित मुलीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस सूत्रांनुसार पीडित मुलगी ११वीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थीनी आहे. १५ सप्टेंबर २०१२ला घरातून कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती घरी परतली नाही.

चौकशी केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलिसांनी चौकशी दरम्यान एका गुप्त सुचनेच्या आधारे मुलीची सुटका केली. चारही आरोपी देखील अल्पवयीन असल्याने सध्या त्यांना कोर्टासमोर नेण्यात आलं होतं.

First Published: Wednesday, December 5, 2012, 10:59


comments powered by Disqus