Last Updated: Tuesday, March 18, 2014, 23:35
www.24taas.com, झी मीडिया, करौलीराजस्थानच्या करौलीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने अंगावर रंग टाकू न दिल्याने तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करौली जिल्ह्यातल्या रानीपुरा गावात सोमवारी दुपारी मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत होळी साजरी करत होती. यावेळी गावातील नरेंद्र, भूरा व प्रकाशने तिच्या अंगावर रंग टाकण्याचा प्रयत्न केला.
तिने रंग टाकण्यास विरोध केला होता. काही वेळानंतर तिघांनी तिला उचलून अज्ञातस्थळी नेले. तिघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडित मुलगी घरी आल्यानंतर याबाबतची माहिती तिने कुटुंबीयांना दिली. सोमवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी फरार असून, पोलिस पुढील तपास सुरू केला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Tuesday, March 18, 2014, 22:39