गँगरेप प्रकरण: तरूणीची प्रकृती खालावली, उपचारासाठी सिंगापूरला रवाना, Gang-rape victim flown to Singapore for treatment

गँगरेप: तरूणीची प्रकृती नाजूक, सिंगापूरला हलवले

गँगरेप: तरूणीची प्रकृती नाजूक, सिंगापूरला हलवले
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्ली गॅंगरेप प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती अधिकच खालवली असल्याने तरूणीला तात्काळ सिंगापूरला हलविण्यात आले आहे. बुधवारी रात्री ११.४० वाजता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून एअर अँम्ब्युलन्सद्वारे तिला सिंगापूरला हलवण्यात आले. तेथे ग्लेनईगल समूहाच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार आहे.

पीडित तरूणीचे आई, वडिल आणि भाऊसोबत आहेत. बुधवारी सकाळीच त्यांचे पासपोर्ट तयार करण्यात आले व पंतप्रधानांच्या विशेषाधिकारात व्हिसा काढण्यात आला. मंगळवारी रात्री उशिरा तिला हार्ट अँटॅक आला. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली.

तिला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले व हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगितले. तिला 16 डिसेंबर रोजी रात्री उशिरा सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरुणीचे लहान आतडे ऑपरेशन करून काढण्यात आले आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज भासू शकते. आधी अमेरिकेला पाठवण्याचे नियोजन होते. याच रुग्णालयात रजनीकांत आणि अमरसिंह यांच्यावर यशस्वी उपचार झाले आहेत.

First Published: Thursday, December 27, 2012, 07:52


comments powered by Disqus