लज्जास्पद! चालत्या गाडीत आणखी एक बलात्कार, gangrape in amritsar in car

लज्जास्पद! चालत्या गाडीत आणखी एक बलात्कार

लज्जास्पद! चालत्या गाडीत आणखी एक बलात्कार
www.24taas.com, अमृतसर

चालत्या गाडीमध्ये एका वीस वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा अमृतसरमध्ये घडलीय.

सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी कामावरून घरी परतत असताना बस स्डॅंडवर दोन अज्ञात इसमांनी तिला गाडीत खेचलं. थोड्या वेळानं आणखी दोन जण गाडीत चढले. बलात्कार करताना त्यांनी गाडीत जोराने गाणी लावली होती. त्यामुळे जेणेकरून रस्त्यावरील इतरांना गाडीत चाललेल्या प्रकाराचा अंदाजाही आला नाही.

बलात्कार केल्यानंतर आरोपींनी कॅम्प परिसराच्या आसपास गाडीतून बाहेर ढकलून दिल्याचं पीडित तरुणीनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी त्यानंतर ताबडतोब तिला लगेच हॉस्पीटलमध्ये हालवलं. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय. चार आरोपींपैकी दोघांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय.

First Published: Tuesday, March 26, 2013, 15:43


comments powered by Disqus