पेट्रोल पंपावर मिळणार गॅस सिलिंडर , Get on the gas cylinder petrol pump

पेट्रोल पंपावर मिळणार गॅस सिलिंडर

पेट्रोल पंपावर मिळणार गॅस सिलिंडर
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

तुमच्या घरातील गॅस संपलाय, तर मग घाबरू नका. गॅस सिलिंडर पाहिजे असेल तर तडक पेट्रोल पंपावर जा. त्याठिकाणी तुम्हला गॅस सिलिंडर ताबडतोब मिळू शकेल. ही सुविधा सध्या देशातील प्रमुख शहरांसाठी उपलब्ध आहे.

देशातील महानगरातील कंपनी संचालित पेट्रोल पंपावर ५ किलो वजनाचा स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर (एलपीजी) विकण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या गॅस सिलिंडरची किमंत घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या प्रति किलो २८.८० रुपये दराच्या दुप्पट असेल.

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थी किंवा घरगुती गॅस ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार छोटेखानी सिलिंडर पेट्रोल पंपावर उपलब्ध होणार आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू महानगरांतील काही निवडक पेट्रोलपंपांवरून या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

सुरूवातीला सिलिंडर खरेदी करतेवेळी ग्राहकांना सिलिंडरची किंमत, प्रशासकीय खर्च आणि इंधनाची किंमत मोजावी लागणार आहे. नंतर सिलिंडर भरतेवेळी मात्र केवळ इंधनाची किंमत द्यावी लागणार आहे. सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांना मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, कर्मचारी ओळखपत्र, पासपोर्ट, विद्यार्थी ओळखपत्र आदींची छायांकित प्रत ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

गॅसचा दर वाढीव

अनुदानित गॅस सिलिंडरच्या प्रति किलो २८.८० रुपये दराच्या दुप्पट असणार आहे. त्यामुळे मुंबईत पाच किलो अनुदानित सिलिंडरची किंमत १६३ रुपये आहे. पेट्रोल पंपावर ३९६ रुपयांना मिळेल. दिल्लीत पाच किलोचे अनुदानित सिलिंडर १५२ रुपयांना पडते तर विनाअनुदानित सिलिंडर ३६२ रुपये मिळू शकेल.

First Published: Thursday, July 25, 2013, 10:40


comments powered by Disqus