ती म्हणतेय, मला ‘ति’च्याशीच करायचंय लग्न!, girl want to marry another girl

ती म्हणतेय, मला ‘ति’च्याशीच करायचंय लग्न!

ती म्हणतेय, मला ‘ति’च्याशीच करायचंय लग्न!
www.24taas.com, झी मीडिया, भिवानी

आपल्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडलेल्या युवतीनं मैत्रिणीनं लग्नाला नकार दिल्यानं तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलंय. तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील भिवानी इथं राहणाऱ्या या दोन्ही अल्पवयीन आहेत. दोघीही एकाच वर्गात शिकतात. प्रेमात पडलेली युवतीनं आपल्या मैत्रिणीशीच लग्न करण्याचा हट्ट धरलाय. तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तिच्या वर्तनात कोणताही फरक झालेला नाही. ज्युवेनाईल होमला धमकी देताना, तीनं मैत्रिणीशी लग्न झालं नाही तर आत्महत्या करण्याची धमकीही दिलीय. सिनीअर पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस कर्मचाऱ्यांनी तीचं काऊन्सिलींग केल्यानंतरही ते तिला समजावण्यात अपयशी ठरलेत.

दोन्ही मुली भिवानीच्या सनवार गावातील सीनियर सेकंडरी गर्ल्स स्कूलमध्ये शिकतात. दोघींनीही नुकतीच अकरावीची परीक्षा पास केल्यानंतर बारावीमध्ये प्रवेश मिळवलाय. चौकशीनंतर या दोघींची मागच्या तीन वर्षांपासून पक्की मैत्री आहे. दोघी शाळेच्या बाहेरही बराच वेळ एकमेकींसोबत घालत होत्या. परंतू, त्यातल्या एकीनं दुसरीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि समस्यांना सुरुवात झाली.

पीडित मुलीनं आपल्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली. तिच्या कुटुंबियांनी तिच्या प्रेमात वेड्या झालेल्या तिच्या मैत्रिणीला समजावण्याचा प्रयत्न केला परंतू तो व्यर्थ ठरला. त्यानंतर घरात पीडित मुलगी एकटीच असताना ‘ती’नं चाकूनं हल्ला केला. शेवटी कंटाळून पीडित मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 18, 2013, 16:28


comments powered by Disqus