24taas.com- gitika suicide case

माजी मंत्र्यांच्या ‘काम’गिरीमुळे गीतिकाची आत्महत्या

माजी मंत्र्यांच्या ‘काम’गिरीमुळे गीतिकाची आत्महत्या
www.24taas.com, नवी दिल्ली

एमडीएलआर कंपनीची एअरहॉस्टेस गीतिका शर्माच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस सुत्रांच्या मते, गीतिकाचं यौन शोषण करण्यात आलं होतं. गीतिकसोबत अनेक दिवस अनैतिक संबंध ठेवण्यात आले होते. तसचं तिच्यासोबत अप्राकृतिक संभोग करण्यात येत होता. तसचं तिचं याआधी गर्भपातही करण्यात आला होता.

आतापर्यंतच्या चौकशी दरम्यान असं समोर आलं आहे की, जेव्हा एमडीएलआर एअर लाईनच्या सहाय्यक कंपनीचं डायरेक्टर बनविण्यात आलं तेव्हा त्यात अट होती की, गीतिका रोज संध्याकाळी कंपनीच्या चेअरमनला रिपोर्ट करेल, पोलीस यामागील कांडाच्या एकूण वर्तनचा शोध घेत आहे.

हरियाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा या प्रकरणात फरार आहे. गीतिकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत कांडा आणि कंपनीचे मॅनेजर अरूणा यांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.


First Published: Tuesday, August 14, 2012, 13:28


comments powered by Disqus