Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:26
www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरू आपल्या गायन शैलीने रसिकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे आज गुरुवारी सकाळी येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांना आपलीही श्रद्धांजली द्या.
मन्ना यांना फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना निधन झाले. ९४ वर्षीय मन्ना डे यांनी १९४३ साली त्यांची पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली. तमन्ना या चित्रपटासाठी ते पहिल्यांदा गायले. हिंदी, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांत मिळून त्यांनी सुमारे साडेतीन हजार गाणी गायली. त्यांनी कोलकाता येथून ऑल इंडिया रेडिओवरही त्यांनी कार्यक्रम केले. त्यांना अनेक पुसस्कार मिळाले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभुषण आदींचा यात समावेश आहे. अशा महान गायकाला आपलीही श्रद्धांजली द्या.
आपली श्रद्धांजली देण्यासाठी खालील बॉक्समध्ये तुमचं नाव, ई-मेल, पत्ता, गावाचे नाव टाईप करा.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 24, 2013, 09:54