Last Updated: Thursday, September 19, 2013, 13:27
www.24taas.com, झी मीडिया, पणजी केंद्रीय उत्पादक आणि सीमा शुल्क विभागाने गोवा विमानतळावर केलेल्या एका कारवाईत १२ किलो सोनं जप्त केलय. दोघा श्रीलंकन नागरिकांकडून जप्त केलेल्या या सोन्याची किमंत ३ कोटी ६० लाख रूपये आहे.
दुबई व्हाया मुंबई,गोवा या एअर इंडियाच्या ९८४ या विमानतून मुहम्मद झुबेर शेख सुलेमान आणि मुहंम्मद रियाज मोहम्मद नियाज हे प्रवास करत होते.
दुबईमध्ये खरेदी केलेले एक किलो सोने घेऊन ते गोव्यात पोहोचल्यानंतर संशयास्पद हालचालींमुळे कस्टम अधिका-यांनी अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार लक्षात आला. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, September 19, 2013, 13:01