Last Updated: Saturday, November 3, 2012, 17:21
www.24taas.com, पणजी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पार्रिकरने आज स्पष्ट केलं की, गोव्यात अमेरिकास्थित समूहाने भारतीय फ्रैचांइजी प्लेबॉय क्लबच्या प्रवेशाबाबत चौकशी केली जाईल. त्यांनी सांगितलं की, जर यात काही गडबड असेल तर आम्ही याला परवानगी देणार नाही. प्लेबॉय क्लबने गोव्यात त्यांचा क्लब सुरू करणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मला या प्रकरणात नक्कीच लक्ष घालावे लागणार आहे. फक्त क्लबचं नाव प्लेबॉय आहे, त्यामुळे आम्ही कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. प्लेबॉय क्लबने भारतात गोव्यामध्ये कंडोलिम समुद्रकिनारी आपला क्लब उघडण्याची तयारी केली आहे. आणि पुढील दहा वर्षात असे १०० क्लब खोलण्याची योजना आहे.
गोवा पर्यटन विभागाचे निर्देशक निखिल देसाईने यांची पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, या क्लबला अजून मान्यता दिली गेली नाही. देसाईंनी असंही सांगितलं आहे की, क्लबमध्ये नग्नता, अश्लीलता जर मनोरंजनच्या दृष्टीने पाहिलं जाणार असेल तर हा क्लब त्वरीत बंद करण्यात येईल. महिलांनीही ह्या क्लबला विरोध केला आहे.
First Published: Saturday, November 3, 2012, 17:13