नववर्षाच्या पार्टीसाठी गोवा `हाऊसफुल`! Goa house full for new year

नववर्षाच्या पार्टीसाठी गोवा `हाऊसफुल`!

नववर्षाच्या पार्टीसाठी गोवा `हाऊसफुल`!
www.24taas.com, पणजी

2012 या वर्षाला गुडबाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागातासाठी गोवानगरी सज्ज झालीय. गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची रीघ लागलीय. गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊस फुल झालेत.

निसर्गरम्य गोव्यातल्या बीचवर पर्यटक अथांग लाटा, मऊशार रेतीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. उत्तर गोव्यातील कलंगुट अंजूना, बागा, वागातोर, सिक्केरी, मीरामार, डोनापावला हे किनारा पर्यटकांच्या गर्दीनं फुलुन गेली आहेत.तर दक्षिण गोव्यातल्या कोलवा, वार्का, मोजोर्डा, पालोलेम आणि मोबोर यासारखे किना-यांना परदेशी पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे.

अनेक किना-यावर वॉटरस्पोर्टसचा अनुभव पर्यटक घेत आहेत. तर वॉटरबाईकने समुद्राचा फेरफटका मारण्याला पर्यटक अधिक पसंती देताना दिसत आहेत. किना-यावरील पॅराग्लाडिंगही पर्यटकांच्या आनंदात आणि जल्लोषात रंगत आणते.

First Published: Sunday, December 30, 2012, 23:39


comments powered by Disqus