गोव्यात मराठीसाठी `जिंकू किंवा मरू` Goa`s state language Marathi!

गोव्यात मराठीसाठी `जिंकू किंवा मरू`

गोव्यात मराठीसाठी `जिंकू किंवा मरू`
www.24taas.com, पणजी

गोव्यात मराठीला राज्यभाषेचा दर्जा देण्यासाठी गोमंतकीय आक्रमक झालेत. मराठी राज्यभाषेचा लढा `जिंकू किंवा मरू` असा निर्धार गोव्यातल्या मराठीजनांनी केला आहे. यासाठी येत्या 29 जानेवारीपासून विधानसभेसमोर धरणं धरण्यात येणार आहे.

गेल्या 25 वर्षांपासून गोवेकर यासाठी लढा देत आहेत. इथलं संपूर्ण कामकाज मराठीतून चालतं. 63 टक्के लोक मराठी आहेत, 8 वृत्तपत्र मराठी निघतात तसंच 900 प्राथमिक शाळा मराठी आहेत. त्यामुळं गोव्याची राज्यभाषा मराठी असायला हवी अशी मागणी त्यांनी केलीय.

विशेष म्हणजे गोव्यातील बहुतांश आमदार मराठी भाषेच्या बाजूने असल्यानं ही चळवळ अधिक आक्रमक होणार आहे.

First Published: Sunday, January 27, 2013, 23:46


comments powered by Disqus