शाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार..., goa school has no need notebook & textbook

शाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार...

शाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार...
www.24taas.com, झी मीडिया, गोवा

गोव्यातील शिक्षण हायटेक करण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसलीय. याचाच एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांमधून वह्या-पुस्तकं बाद होणार आहेत.

गोव्यातील शाळांमध्ये पुढील महिन्यापासून पाचवी आणि सहावीतील सर्व विद्यार्थ्यांना ई-नोटबुकवरून शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे वह्या, पुस्तके बाद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. गोवा राज्याने शिक्षणामध्ये ई-क्रांती घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय.

गोवा राज्याने संगणकाचे शिक्षण विद्यार्थ्यांना बालवयापासूनच देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ५०० हजार ई-नोटबुक वाटण्यात येणार आहेत. यासाठी पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 12:19


comments powered by Disqus