गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात, gokulaashtami priparation is very big

गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात

गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

आज कृष्ण जन्माष्टमी आहे. कंसाचा विनाश करणाऱ्या श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण देशभरात हा जन्मदिवस गोकुळाष्टमीच्या रूपात साजरा केला जातो. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असल्याचं मानलं जातं.

यादिवशी कृष्ण मंदिरात जोरात तयारी केली जाते. कृष्ण मंदिराची सजावट केली जाते. प्रत्येक घरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देश विदेशातील लाखो लोक या दिवशी मथुरेला कृष्णाच्या जन्मस्थानी जात असतात. कृष्णाचे जन्मस्थान असणाऱ्य़ा परिसरात भव्य तयारी केली जाते आणि मोठ्या जल्लोषात जन्माष्टमी साजरी केली जाते.

जन्माष्टमीच्या दिवशी सर्वत्र जोरात तयारी चालू असते. लोक मध्यरात्री १२ वाजेपर्यंत उपवास करतात. कृष्णाला पाळण्यात ठेवून झुलवलं जातं. जन्माष्टमीला मथुरा, वृंदावन, गोकुळ, बलदेव, नंदगाव सारख्या अनेक ठिकाणी कृष्ण मंदिरांची सजावट केली जाते. मोठ्या उत्साहात कृष्णाचे स्वागत केले जाते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 18:01


comments powered by Disqus