Last Updated: Saturday, November 23, 2013, 19:47
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं. काल हेच ३०,२७४ वर बंद झालं होतं. दुसरीकडे चांदीच्या किंमतीमध्येही घसरण पाहायला मिळाली. १.१३ टक्क्यांनी म्हणजेच ५११ रुपयांनी घसरून चांदी प्रति किलो ४४,६२६ रुपयांवर पोहोचली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या संभावित पावलांचा परिणाम म्हणून सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये घसरण होतेय, असं म्हटलं जातंय. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयांबद्दल आत्ताचं काही सांगणं कठिण असल्यानं सोन्याच्या किंमतीत आणखी काही दिवस घसरण दिसून येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
परंतु, भारतात मात्र लग्नाचा सीझन सुरू असल्यानं सोन्याच्या मागणीतही वाढ दिसून आलीय. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 19:47