सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण, Gold prices in India

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सट्टेबाजांनी मागणी कमी केल्याने सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

मुंबईमध्ये ९९.५ शुद्ध सोन्याचा भाव शनिवारी ३०,९६५ रूपये होता. बाजार बंद झाला त्यावेळी सोने १० ग्रॅम प्रति तोळा ३१, १३० वर बंद झाला. १६५ रूपयांनी सोन्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. तर सोमवारी सोन्याचा भाव २९, ८५६ रूपयांवर आला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ४९, ७५० रूपये होता. या भावात ७०० रूपयांनी वाढ झाली.

उच्च पातळीवर असलेल्या या मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्याने ही घसरण दिसून आली. तसेच जागतिक बाजारातही सोने-चांदीचा भाव कोसळला. याचाही परिणाम सोने बाजारावर झालेला दिसत आहे. तर सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.३३ टक्क्यांनी कमी होऊन १,३१२.२० डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

शहर निहाय सोने आणि चांदी खालील प्रमाणे दर आहेत:
(१० ग्रॅम / प्रति तोळा -किलो दर)

मुंबई
सोने: ३०,१९८ (+१३३) / चांदी: रुपये ४९,७५० (+७००)

दिल्ली
सोने: रु ३१,८९० (+२४०) / चांदी: रुपये ४९,३५० (+८५०)

चेन्नई
सोने: रु ३१.२६५ / चांदी: रु ४९.१०५

कोलकता
सोने: रु ३१,६१५/ चांदी: रु ४८,८००

बंगळुरू
सोने: रु ३१,६१८ / चांदी: रु ४९,४००

हैदराबाद
सोने: रु ३१,४०० / चांदी: रु ४९,६००

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 11:57


comments powered by Disqus