Last Updated: Thursday, June 27, 2013, 08:38
www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.
सोन्याचे भाव पुन्हा एकदा गडगडत २६ हजाराच्या जवळ येऊन पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात गडगडणारे सोने थोडे सावरत २८ हजार रूपयापर्यंत मजल मारली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सोने दराची घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षातील सोने आणि चांदीची सर्वात निचांकी घसरण आज नोंदवली गेली आहे.
सोने २६,१५० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके खाली उतरले असून ग्राहकांचा सोने खरेदीचा कल कायम दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसाच्या सुरुवातीलाच सोने ४०० रुपयांनी कोसळले होते. यासोबत चांदीचे भाव देखील खाली कोसळले आहेत.
कॉमॅक्सवर सोने २ टक्क्यांनी कमी होऊन १२५० वर येऊन पोहचले आहे. तर चांदी ३ टक्के खाली उतरून १९ डॉलरने खाली आली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली होत असल्याने सोने-चांदीचे भाव उतरू लागले आहेत. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव पडल्यानंतरही सोने-चांदीचे भाव गडगडले आहेत. हे विशेष
सोने-चांदीमध्ये सध्या सुरू असेली घसरण पाहता चांदी ३८,५०० रुपये आणि सोने २५,५००-२५,२००पर्यंत घसरू शकते, अशी शक्यता तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे. सोन्याचे भाव असेच घसरत राहिले तर सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढेल, असे सोने-चांदी व्यापारांचे म्हणणे आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 08:38