Last Updated: Wednesday, September 5, 2012, 08:31
www.24taas.com, नवी दिल्ली आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढत सोन्याच्या दरानं आज नवा उच्चांक गाठलाय. नवी दिल्लीतल्या सराफ बाजारात दहा ग्रॅम सोन्याचा दर ३१ हजार ८५० रुपये राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला असलेल्या जोरदार मागणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठांमध्येही सोनं आणि चांदीच्या दरांनी नवे विक्रम नोंदवलेत. चांदीच्या दरात आज तब्बल १२०० रुपयांची वाढ होत प्रतिकिलो ६० हजार २०० रुपयांवर हा भाव गेलाय. सणासुदीचे दिवस सुरू झालेत. नुकताच पार पडलेला रमजान तर सुरू झालेली गणेशोत्सवाची तयारी आणि त्यानंतर नवरात्र – दिवाळी असे एकावर एक येणारे सणांचे दिवस... यामुळे काही दिवसांत बाजारात मागणी कायम राहण्याची शक्यता असल्यानं सोन्या-चांदीचे दर नवे उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, September 5, 2012, 08:31