Last Updated: Tuesday, September 17, 2013, 13:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि स्थानिक बाजारात कमी मागणी यांमुळे सराफा बाजारातील सोनं २०० रुपयांनी खाली घसरलंय.
सध्या, सोन्याची किंमत ३०,१०० रुपये प्रति दहा ग्राम आहे. औद्योगिक मागणी घटल्यानं चांदीचेही भाव उतरलेत. १,२२० रुपयांनी घसरुन हे भाव आता ४९,५३० रुपये किलोवर पोहोचलेत.
सराफा बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, सीरियातील रासायनिक हत्यारं नष्ट करण्याच्या योजनेवर अमेरिका आणि रशियानं दाखविलेल्या सहमतीमुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींमध्य घट झालीय.
लंडनमध्ये सोन्याचे भाग ०.५ टक्के घसरून १,३२०.२१ डॉलर प्रति औंसवर पोहचलेत. भारतात मात्र गेल्या चार आठवड्यांत सोन्याचे भाव १,०७० रुपये प्रति दहा ग्रॅम खाली पडलेत. चांदीच्या नाण्यांचा लिलावातील भाव ८४,००० रुपये नोंदविण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, September 17, 2013, 13:05