Last Updated: Tuesday, January 28, 2014, 15:49
www.24taas.com, झी मीडिया, चैन्नई एका मालवाहक विमानामधून अधिकाऱ्यांनी अवैधरित्या भारतात आणलं जाणारं तब्बल २७ किलो सोनं जप्त केलंय.
जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळजवळ १० करोड असल्याचं सांगण्यात येतंय. `डिरोक्टरेट ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स`च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी एका खाजगी एअरलाईन्सच्या `कार्गो प्लेन`मध्ये धाड टाकली.
या विमानात अनेक बॉक्स भरलेले होते. यामध्ये मोबाईल फोन भरलेले होते. परंतु, हे सेलफोन खोलून पाहिले असता त्यामध्ये सोनं निघालं.
हाँगकाँगमधून हे सोनं भारतात येत असल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 15:40