Last Updated: Wednesday, November 14, 2012, 18:52
www.24taas.com, सिडनी जगभरातल्या वेबसाईटसमध्ये वरच्या क्रमांक लागणारी वेबसाईटपैकी एक आहे गुगल... आपल्या विविधपयोगीपणामुळे ही वेबसाईट आज प्रचंड लोकप्रिय ठरलीय. पण, एका व्यक्तीला त्रास दिल्याबद्दल तब्ब्ल दोन लाख आठ हजार डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.
एका ऑस्ट्रेलियन नागरीकाबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल न्यायाधिशांनी गुगलला हा दंड ठोठावलाय. ६२ वर्षीय मनोरंजन क्षेत्रातील क्रांतीकारी समजल्या जाणाऱ्या मिलार्ड तर्कुलजा यांना २००४ साली गोळी मारण्यात आली होती. परंतू, आजपर्यंत याप्रकरणाचा तपास लागलेला नाही. ‘मी एक मोठा अपराधी आहे आणि म्हणूनच मी अनेकांचं निशाण्यावर आहे, असा मजकूर छापून गुगलनं माझा अपमान केलाय’ असा आरोप तर्कुलजा यांनी केलाय. त्यांचा हा आक्षेप योग्य मानून न्यायाधिशांनी गुगलला दोन लाख आठ हजार डॉलर्सचा दंड ठोठावलाय.
First Published: Wednesday, November 14, 2012, 18:52