`गीतिकासोबत त्याला` फक्त हवे होते शारीरिक संबंध, Gopal kanda want to only sex with geetika

`गीतिकासोबत त्याला` फक्त हवे होते शारीरिक संबंध

`गीतिकासोबत त्याला` फक्त हवे होते शारीरिक संबंध
www.24taas.com, नवी दिल्ली

पूर्व एअर हॉस्टेस गीतिका शर्मा आत्महत्येप्रकरणी एक नवचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एक आरोपी अरूण चड्ढा ने सांगितले आहे की, गीतिकासोबत शारीरिक संबंधच गोपाळ कांडाला ठेवयाचे होते. आणि त्यासाठी तो तिच्यावर नेहमीच जबरदस्तीही करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर गीतिकाला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. आणि त्यासाठी तिने त्याच्याजवळ नेहमीच हट्टही केला होता. मात्र कांडा त्यासाठी कधीच तयार होत नव्हता.

पोलिसांना दिलेल्या जबानीत अरूणने सांगितले की, या अनैतिक संबंधापासून गीतिका प्रचंड वैतागली होती. आणि त्यामुळेच तिने कांडाकडे नेहमीच लग्नासाठी तगादा लावून धरला होता. कारण की, लग्नानंतर तिला या सगळ्यातून मुक्ती मिळाली असती. मात्र कांडाला फक्त तिचं शरीरच उपभोगायचं होतं. त्यामुळे तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी लग्न करणं हाच एक पर्याय दिसत होता.

अरूणच्या म्हणण्यानुसार गीतिकाला कांडाचे दुसऱ्या महिलांसोबत असणारे संबंधही मंजूर नव्हते. खासकरून गोव्यातील अंकितासोबत कांडाचे संबंध यातून गीतिका आणि कांडामध्ये नेहमीच वाद होत असे.


First Published: Tuesday, October 23, 2012, 13:15


comments powered by Disqus